धाकधूक वाढली
पुणे | प्रतिनिधी |
कोरोनाकाळात सर्वाधिक संसर्गबाधित असलेल्या पुणे शहरात आता दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीमध्ये ओमिक्रोन कोरोनाची लक्षण आढळून आली आहेत. त्यामुळे पुणेकरांची धाकधूक वाढली आहे.
पुणे महापालिकेच्या अधिकार्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, दक्षिण अफ्रिकेतून पुण्यामध्ये एक प्रवासी दाखल झाला असून त्यामध्ये कोरोनाची लक्षण दिसत आहेत. पण अद्याप या व्यक्तीचा तपासणी अहवाल समोर आलेला नाही, तो आल्यानंतर याबाबत नक्की काय ते सांगता येईल.
केंद्राच्या राज्यांना सूचना
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकार्यांसोबत या नव्या व्हेरियंटपासून वाचण्यासाठी चर्चा केली. या बैठकीत त्यांनी सर्व राज्यांना सहा सूत्रांमध्ये उपाययोजना सांगितल्या आहेत.
जर राज्यांनी हे उपाय अवलंबले तर ओमिक्रॉन व्हेरियंटबाबत लवकरात लवकर माहिती कळेल आणि त्यापासून बचावासाठी उपाययोजना करणे सोपे जाईल. केंद्राने जे उपाय राज्यांना अवलंबायला सांगितले आहेत, केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना म्हटलंय की, त्यांनी चाचण्यांमध्ये वाढ करावी. जेणेकरुन व्हेरियंटने संक्रमित रुग्ण तातडीने सापडेल आणि त्याचा संभाव्य प्रसार रोखता येईल.
केंद्राचे नवे नियम
राज्यानी कंटेनमेंट झोन तयार करावेत
हॉटस्पॉटवर लक्ष ठेवणे
लसीकरणामध्ये अधिकाधिक वाढ करणे
आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करा
आरटी-पीसीआर रॅट चाचण्यांमध्ये आढळतो ओमिक्रॉन