क्रिकेट स्पर्धेत ओमकर संघ विजेता

। नागोठणे । वार्ताहर ।
शिव सह्याद्री मित्रमंडळ गवळआळी, नागोठणे यांच्या वतीने भरविण्यात आलेल्या कै. राजेंद्र मारुती चौलकर स्मृती चषक भव्य नाईट अंडरम क्रिकेटच्या अंतिम सामन्यात ओमकर क्रिकेट क्लब कोळीवाडा, नागोठणे या संघाने ज्वाला ग्रुप नागोठणे खडक आळी, नागोठणे या संघाचा पराभव करुन प्रथम क्रमांकाचे 7001 रूपयाचे रोख पारितोषिक व चषक पटकावला .
ज्वाला ग्रुप खडकआळी, नागोठणे या संघाला 5001 रूपयाचे पारितोषिक व चषकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत तृतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे कानिफनाथ मंडळ मराठा आळी, नागोठणे व रमाई नगर, नागोठणे यांना प्रत्येकी 2501 रूपये व चषक यांना देऊन गौरविण्यात आले. याशिवाय उत्कृष्ठ गोलंदाज, फलंदाज व क्षेत्ररक्षक खेळाडूंचाही आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नागोठण्याचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पेण सुधागड मतदार संघाचे उपाध्यक्ष विलास चौलकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मंडळाचे सल्लागार गणेश घाग, संदीप राऊत, शेखर जोगत, संजय राऊत, दर्शन वादळ, प्रणव वादळ, सुशांत धुमाळ, जयेश चौलकर, दिनेश वादळ, संतोष पाटिल, अविनाश घाग, अक्षय घाग, प्रशांत नाकटे तसेच असोसियनचे अध्यक्ष राजेश सुर्वे व मंडळाचे सर्व पधादिकारी उपस्थित होते.

Exit mobile version