सुप्रिया पाटील, चित्रलेखा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त पीएनपीत रक्तदान शिबिर संपन्न

। अलिबाग । प्रतिनिधी ।

दी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लि. मुंबई बँकेच्या सदस्या, अलिबाग को-ऑप. अर्बन बँक लि. च्या अध्यक्षा सुप्रियाताई पाटील व पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वेश्‍वी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, एच.डी.एफ.सी. बँक शाखा अलिबाग, शासकीय रक्तपेढी, शासकीय जिल्हा रुग्णालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे पीएनपी संकुल मल्टीपर्पज सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले होते.

सदर शिबिरास पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, पीएनपी कॉलेजचे डायरेक्टर विक्रांत वार्डे, जिल्हा रुग्णालय अलिबागच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शितल जोशी व इतर अधिकारी, पीएनपी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. रवींद्र पाटील व प्रा. पल्लवी पाटील, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, एच.डी.एफ.सी. बँक अलिबाग शाखा व्यवस्थापक निलेश मोरे व इतर अधिकारी सुरेश पिटनाईक, अजिंक्य कुडव, सुबोध ताडकर, अक्षय पाटील, मयूर त्रिभुवन व इतर मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते. या प्रसंगी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकतेर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी रक्तदान केले.

Exit mobile version