| रत्नागिरी | प्रतिनिधी |
तालुक्यातील नेवरे खाडीत बुडून एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची ही घटना शनिवारी (दि.11) जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वा. सुमारास घडली. दिलीप सहदेव फणसे (42), रा. चिंचवणे नेवरे, रत्नागिरी असे खाडीत बुडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी नेवरे येथील खाडीच्या पाण्यात तेथील ग्रामस्थांना दिलीप फणसे हा बुडून मृतावस्थेत दिसला. याबाबत त्यांनी ग्रामीण पोलिसांना माहिती देताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.