उरण चिरले येथील समीर पाटील व भाग्यश्री पाटील या दांपत्य भाविकाकडून मुकुट अर्पण
| खोपोली | संतोषी म्हात्रे|
अष्टविनायक तीर्थक्षेत्रांपैकी असलेला महड येथील इच्छापूर्ती श्री वरदविनायक गणपती बाप्पा चरणी दररोज असंख्य भक्तगण येऊन मनोभावे पूजाअर्चा करत असतात. तर श्री वरदविनायक गणपती बाप्पा भक्तांच्या नवसाला पावत असल्याने उरण तालुक्यातील चिरले येथील समीर सुधाकर पाटील व भाग्यश्री पाटील यांना श्री वरदविनायक गणपती बाप्पा पावल्याने या दांपत्याने गणपती बाप्पाला 10 फेब्रुवारी रोजी दीड किलोचा चांदीचा मुकुट अर्पण केला. हा चांदीचा मुकुट समीर पाटील यांनी महड देवस्थानकडे सुपूर्द केल्याने महड देवस्थानच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवि शेळके, पंकज मढवी, विराज कोळी, जयेश पाटील, अक्षय पाटील, नितेश पाटील, विजय सोनी, महड देवस्थानचे अतुल बडगुजर, अशोक बागुल, राजेश झानपुरे गुरुजी आदी उपस्थित होते. भक्तांच्या नवसाला पावणारा अशी ओळख असलेल्या महडच्या श्री वरदविनायक गणपती बापाच्या खजिन्यात चांदीच्या दागिन्यांची भर पडली. उरण तालुक्यातील चिरले येथील नक्ष लॉजिस्टिकचे समीर सुधाकर पाटील व भाग्यश्री पाटील या दांपत्य भाविकांकडून श्री वरदविनायका चरणी दीड किलो चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला. हा मुकुट 4 लाख 25 हजार रूपये किंमतीचा सुमारे दीड किलो वजनाचा चांदीचा आहे. समीर पाटील व भाग्यश्री पाटील हे श्री वरदविनायकाचे निस्सिम भक्त आहेत. अनेक दिवसांपासून देवाला चांदीचा मुकुट अर्पण करण्याची त्यांची इच्छा होती. 10 फेब्रुवारी रोजी अखेर त्यांची ही इच्छा पूर्ण झाली.







