ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कर्मचार्याचा सहभाग
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यरत कर्मचार्याने वेतनाच्या निधीतच भ्रष्टाचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. एक कोटी 19 लाख रुपयांचा त्याने अपहार केल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांंनी दिली आहे. त्यामुळे हा कर्मचारी अडचणीत सापडला असून याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
नाना कोरडे असे या कर्मचार्याचे नाव आहे. हा कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषदमध्ये कार्यरत आहे. यापूर्वी त्याने म्हसळामध्ये महिला व बालकल्याण विभागात काम केले आहे. आर्थिक वर्षातील इन्कम टॅक्सचे कामकाज पाहत असताना जिल्हा परिषदेतील एका महिला कर्मचार्यांना काही बिलांमध्ये अफरातफर असल्याचे आढळून आले. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्ेटवाड यांच्या लक्षात आल्यावर तपासणी केली. त्या तपासणीत कर्मचार्यांच्या पगारातील रकमेत अपहार केल्याचे दिसून आले. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील नाना कोरडे याने हा प्रकार केल्याचे समोर आले. या अपहाराबाबत चौकशी करण्यासाठी पाच जणांची समिती गठीत केली आहे. आठवड्यात या समितीकडून पडताळणी करून आणखी किती शासनाच्या निधीचा अपहार केल्याचे निष्प्पन होणार आहे. याशिवाय कोरडे यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली जाणार असून त्याविरोधात पोलीसांत गुन्हा दाखल केला जाईल असे बास्टेवाड म्हणाले.