| रसायनी | प्रतिनिधी |
जुना मुंबई-पुणे रस्त्यावर चौक वावंढळ गावच्या हद्दीत वावंढळ पुलावर अपघात होऊन कंटेनर गाडी पुलाखाली कोसळून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार म्हणजे जुना मुंबई-पुणे रस्त्यावर वावंढळ पुलावर लोखंडी क्वाईल माल भरलेला कंटेनर पनवेल दिशेकडे जाताना एका कार गाडीला धडक देऊन रविवारी रात्रीच्या सुमारास पुलावरून कोसळला. यात एकाचा मृत्यू झाला असून, कार गाडीतील दोघेजण सुखरूप आहेत. अपघाताची खबर मिळताच अपघात ग्रस्त टीमचे गुरुनाथ साठेलकर यांनी पोलीस यंत्रणा आणि अपघातग्रस्त ठिकाणाच्या नागरिकांशी संपर्क साधला आणि स्वतः आपल्या टीमसह दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष औटी चौकचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भयाण अंधारात शोधकार्य सुरू झाल्यावर कंटेनरपासून दूर अंतरावर एक जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. मयताच्या बाजूला ड्रायव्हिंग लायसन्स मिळाले आहे. त्यावर रामचंद्र बर्मा असे नाव असून, वडाळा मुंबई असा पत्ता आहे. या पुलावर वारंवार अपघात होत आहे. अनेकांचे जीव गेले असून, आर्थिक नुकसान याचा अंदाज करता येत नाही, तरीही याकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष नाही.