| पनवेल | वार्ताहर |
कुंडेवहाळ गावाच्या हद्दीत डिजिटेक फिल्म स्टुडिओ आहे. या स्टुडिओमध्ये चार लोक कामाला आहेत. बुधवारी (दि.3) रात्री साडेआठच्या सुमारास स्टुडिओमध्ये काम करत असलेला जसपाल रविदास याची सिक्युरिटीची ड्युटी होती. मात्र, संध्याकाळी सात वाजता जसपाल रविदास फिरण्यासाठी बाहेर पडला असता यावेळी अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली व त्यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पनवेल पोलीस ठण्यात अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.