रिक्षाला अपघात; एक जखमी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील कशेळे-खांडस राज्यमार्ग रस्त्यावर अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स या ठिकाणी असलेल्या वळणावर रिक्षाला अपघात झाला. या अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून एक प्रवासी जखमी झाला आहे.

कशेळे खांडस रस्त्यावर अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स या ठिकाणी वळणावर अपघात झाला. त्या अपघातात रिक्षाचालकाचे वेगावर नियंत्रण राहिले नसल्याने अपघात ग्रस्त झाली. रिक्षा प्रवाशांसह जात असताना अपघातग्रस्त होताना रस्त्याच्या डाव्या बाजूला कोसळली. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून रिक्षामधून प्रवास करणारा प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. पुणे येथील देहू रोड येथील ही प्रवासी रिक्षा खांडस जवळील एका फार्म हाऊसकडे पर्यटकांना घेवून जात होती. या रिक्षाला झालेल्या अपघातात सुरेश दगडू वाघमारे हे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताची नोंद कर्जत पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version