कारच्या धडकेने एक जखमी

| पनवेल | वार्ताहर |

कारने मोटारसायकलला धडक दिल्याने कमलेश चंद्रकांत मोझर (33, रा. घणसोली) जखमी झाला आहेत. याप्रकरणी कारचालक तुळशीराम नारायण मुकादम (रा. पनवेल) यांच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कमलेश हा त्याच्या मोटारसायकलने पनवेल येथे आला. तेथून परत जाताना पनवेल गार्डन हॉटेल सिग्नलजवळ तो थांबला होता. सिग्नल मिळाल्यावर तो पुढे जात असताना बेलापूरकडून येणार्‍या कार चालकाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात कमलेश मोजर जखमी झाला. त्याला एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version