बैलाच्या धडकेने एकाचा मृत्यू

चिपळूण । प्रतिनिधी
शहरानजिकच्या मिरजोळी येथे बैलाच्या धडकने मालक जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशोक श्रीपत साळवी (वय 37) असे मृत मालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद अजिंक्य अशोक साळवी यांनी दिली आहे. यानुसार अशोक हे गुरे चरवण्यासाठी मठाचा माळ येथे गेले असता त्यांच्याच मालकीच्या बैलाने त्यांना धडक दिल्याने दुखापत झाली. यामुळे अशोक यांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलवण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. याची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version