पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेलमध्ये भरधाव वेगात दुचाकी चालवताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-पुणे महामार्गावरील बारवाई गावच्या हद्दीत घडली. प्रशांत प्रकाश जाधव (38), रा. कांबे मोहोपाडा असे दुचाकीस्वाराचे नाव असून ते दुचाकीने बारवईकडून समता नगरकडे जात होता. दुचाकी बारवई गावच्या पुढे तालीब अँड श्यामसी कंपनीच्या समोर आले असता त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी रस्त्याकडेच्या झाडाला धडकून हा अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.