ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

| पनवेल । वार्ताहर ।
भरधाव वेगाने ट्रक चालवून एका पादचार्याला धडक मारुन त्यात तो गंभीररित्या जखमी झाल्याने मयत झाल्याची घटना पनवेल जवळील चिंचवण गावाच्या हद्दीत घडली आहे. चिंचवण गावाच्या हद्दीतील नाल्यावरील ब्रिजवरुन आरोपी मेहबुब खान ट्रक चालक हा भरधाव वेगाने जात असताना त्याने रमेश कातकरी (40) याला धडक मारुन त्यात तो गंभीररित्या जखमी होवून मयत झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version