| पनवेल | वार्ताहर |
चार चाकी वाहनाच्या धडकेने गंभीररित्या जखमी होऊन एका पादचार्याचा मृत्यू झाल्याची घटना पळस्पे जवळील जयवंत हॉटेल समोर घडली आहे.
हन्नाल अली अब्दुल लतिफ मनिहार (44) रा.पेठ याला पळस्पे येथील गोवा हायवेवर असलेल्या जयवंत हॉटेल समोर गोवा-पनवेल लेनवर चार चाकी वाहनावरील चालकाने अतिवेगाने गाडी चालवून त्यांना धडक मारुन त्यात ते गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.