एका पिस्टलसह सहा जिवंत काडतुसे जप्त

| पनवेल | प्रतिनिधी |

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर पनवेल शहर पोलिसांनी शहरातून एका पिस्टलसह सहा जिवंत काडतुसे जप्त करून एकाला अटक केली आहे.
पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गोपनीय बातमीदाराच्या बातमीच्या आधारे पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात साफळा लावून एका इसमास पिस्टल व सहा जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. अनंथ अधिमुलम पाडायची (36), रा. सानपाडा असे या इसमाचे नाव असून, त्याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन पोवार, सपोनि सुनील वाघ, पोउपनि किरण राऊत, पोहवा प्रवीण पवार, पोना भोसले, पोशि काकडे, पोशि कराड, पोशि लोखंडे यांनी केली

Exit mobile version