उनाड गुरांमुळे कांद्याची शेती उद्धवस्त

| अलिबाग | प्रतिनिधी |

उनाड जनावरांचा त्रास शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा अनुभव पवेळे, ता.अलिबाग येथील शेतकरी सुभाष बाळाराम भगत यांना आहे. मोठ्या कष्टाने लावलेली कांद्याची शेतीच उनाड जनावरांनी उद्ध्वस्थ केल्याने या शेतकर्‍याचे सत्तर ते ऐंशी हजाराचे नुकसान झालेले आहे.

पवेळेनजीक घरतवाडा येथे भगत यांची एक एकर जमीन आहे. या जमिनीतील 10 गुंठ्यांमध्ये ते दरवर्षी पांढर्‍या कांद्याचे पीक घेतात. त्याचा फायदा भगत परिवाराला होत असतो. यावेळीही त्यांनी मोठ्या कष्टाने कांद्याची लागवड केली. त्याची जोपासनाही केली. गावातील उनाड जनावरांनी ही कांद्याची सारी रोपेच नष्ट करुन टाकल्याने भगत यांना यावर्षी सत्तर ते ऐंशी हजाराचा फटका बसला आहे. या उनाड जनावरांबाबत त्यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रारही केली. पण त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. संबंधित गुरे मालक बिनधास्तपणे आपली जनावरे सोडून देत असल्याबद्दल भगत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Exit mobile version