। पनवेल । वार्ताहर ।
अनोळखी इसमाने एका तरुणाला फोनद्वारे संपर्क करून तो जिओ कंपनीकडून बोलत असल्याचे सांगून तुमचे जिओ कंपनीचे सिमकार्ड एक्सपायर झाल्याचे सांगितले. तसेच तुम्हाला रिचार्ज करायला लागेल असे सांगून त्या मुलाकडे केवायसी मागून जवळपास 20 हजार 967 नेटबँकिंगद्वारे ट्रान्सफर करून त्या तरुणाची फसवणूक केल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
शहरात एका 18 वर्षीय तरुणाला अनोळखी इसमाने फोन द्वारे संपर्क करून तो जिओ कंपनीकडून बोलत असल्याचे सांगितले. तसेच तुमचे जिओ कंपनीचे सिमकार्ड एक्सपायर झाले असून तुम्हाला रिचार्ज करायला लागेल असे सांगितले. त्या मुलाकडे केवायसी मागून जवळपास 20 हजार 967 नेटबँकिंग द्वारे ट्रान्सफर करून त्या तरुणाची फसवणूक केल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. यासंदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून ऑनलाईन फसवणुकीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.