ऑनलाईंन मनी ट्रान्स्फर पडले महागात

| खोपोली | वार्ताहर |

रसायनी पोलिस ठाण्याजवळच सिध्देश्वरी वळणावर वचनपुत्र इंटरप्रायझेस (तत्काळ मनी ट्रान्स्फर) यांच्या दुकानात फिर्यादी अनीष राव गौतम (वय 21) याने वडिलांच्या खात्यावर ऑनलाईंन ट्रान्स्फरकरीता आरोपी नंदलाल आनंद झिंझोरे यांना विश्वासाने दिलेले 15 हजार रुपयांपैकी फक्त 5 हजार रुपये ऑनलाईंन ट्रान्स्फर करुन उर्वरित 10 हजार रुपये ट्रान्स्फर न करता आरोपी रुपेश रामजी मिश्रा आणि नंदलाल आनंद झिंझोरे यांनी स्वःताच्या फायद्यासाठी फसवणूक केली. याप्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार मपोना म्हात्रे, मपोना शेळके अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version