महावितरणचा उघडा कारभार

स्थानिक नागरिकांची नाराज
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड समुद्रकिनार्‍याजवळील विश्राम बागलगत व हिंदू बोर्डिंग शाळेसमोरील रस्त्याच्या बाजूला असलेल्या डीपीचा दरवाजा उघडा असल्याने स्थानिक नागरिकांनी व पालक वर्गानी नाराजी दर्शवली आहे.

याठिकाणी एखादे जनावर चरण्यासाठी जर आले किंवा बाजूला असलेल्या शाळेतील एखाद्या विद्यार्थी खेळताना तो चेंडू काढण्याकरीता जर गेला, तर मोठी दुर्घटना होऊ शकते.तरी वीज मंडळाच्या अधिकार्‍यांनी ताबडतोब याठिकाणीची डीपी बंद करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. खरं तर, प्रत्येक डीपीला लॉक सिस्टिम असते; परंतु विद्युत मंडळाचे वायरमन काम झाल्यावर डीपीचे दार बंद करण्याची तसदी घेत नाही. परंतु, एखादी दुर्घटना घडल्यावर विद्युत मंडळ जबाबदारी घेईल का? असा सवाल नारिकांमधून विचारला जात आहे.

Exit mobile version