रेवदंड्यात खुलेआम मटका अन गुटखा विक्री

। रेवदंडा । वार्ताहर ।

रेवदंडा पोलिस ठाणे हद्दीत बेकायदेशीर मटका खुलेआम सुरू आहेच आता गुटखा विक्री सुध्दा बिनधास्त सुरू झाली आहे. रेवदंडा व परिसरात बेकायदेशीर मटका सुरू असून भ्रमणध्वनीच्या माध्यमातून भर रस्त्यात मटका एजंट मटक्याचे आकडे पाठवित आहेत. एकदंरीत भ्रमणध्वनीने मटका व्यवसाय पूर्वीपेक्षा तेजीत आला असून खुलेआम सुरू आहे. मटका खेळून झटपट श्रीमंत होण्याच्या नादाने अनेक युवावर्ग वाममार्गाला लागले असल्याचे चित्र आहे.

गुटखा विक्रीस पूर्णतः बंदी असताना सुध्दा रेवदंडा व परिसरात बेकायदेशीपणे गुटखा विक्री केली जात आहे. गुटखा आरोग्यास अत्यंत घातक असताना सुध्दा युवावर्ग तोंडात गुटखा ठेवीत पिचकार्‍या भर रस्त्यात फेकत असतात. ही गुटखा विक्री चोरीछुपके होत असून नेहमीच्या ग्राहकांना गुटखा माल पुरविण्यात येतो. गुटखा खरेदी करून घरात अथवा परिसरात ठेवून त्यानंतर रस्त्यावर बेकादेशीरपणे विक्री केली जात आहे. आजूबाजूच्या सर्व शेजारी मंडळीना येथे गुटखा विक्री केली जात. खरेदीसाठी रात्रीचे ग्राहक येत असतात यांची पूर्ण माहिती असते. मात्र तरीही पोलिसांच्या नजरेत हे गुटखा विक्री करणारे का येत नाहीत? असा सवाल केला जातो आहे.

Exit mobile version