| नागोठण | वार्ताहर |
सुकेळी येथील बी. सी. जिंदाल चॅरिटेबल रुग्णालयामध्ये शुक्रवारी( 11 ऑगस्ट, ) सकाळी 11 ते सायंकाळी 5 वा च्या दरम्यान मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मोफत नेत्रचिकित्सा शिबिरात तज्ञ डॉक्टर्स कडून डोळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. ऐनघर पंचक्रोशीसह नागोठणे विभागातील नागरिकांनी या मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.






