भारत मेरा वतन मधून संगीत कलाकारांना उभारी

शंकर महादेवन, मंगेश चव्हाण यांची देशभक्तीवर गीते
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोरोना आल्यापासून संगीत क्षेत्रातील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दीड वर्षांपासून रसिकांसमोर कला सादर करता येत नसल्यानं आणि आर्थिक विवंचनांमुळे या क्षेत्रातील अनेक गायक, वादक, तंत्रज्ञ त्रस्त झाले आहेत. त्यांना उभारी देण्यासाठी गायक मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि इम्युनिटी ग्रुप, एमसीपी आणि आदित्य कला अकॅडमी प्रस्तुत भारत मेरा वतन या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.

सुप्रसिद्ध गायक-संगीतकार शंकर महादेवन आणि मंगेश चव्हाण या दोघांनी मिळून गायलेलं हे देशभक्तिपर गीत 14 ऑगस्टला मंगेश चव्हाण प्रोडक्शन या युट्यूब चॅनल आणि सगळ्या डिजिटल ऑडिओ प्लॅटफॅार्म्सवर प्रदर्शित होणार आहे. या गीताचे शब्द गुलाम कलीम शेख यांचे असून संगीत विजय शिवलकर यांचं आहे. सनई, गिटार, व्हायोलिन, बासरी,ट्रम्पेट अशा विविध वाद्यांनी नटलेल्या भारत मेरा वतन या गाण्याचं काम दोन महिने झूम मिटींगवर सुरु होते.त्यामध्ये 40 पेक्षा जास्त वादकांनी उत्तम वादन केले आहे.भारत मेरा वतन या गाण्याचे संगीत संयोजन अमित भवर यांनी तर मिक्सिंग आणि मास्टरिंग तोसेफ शेख यांनी केले आहे.

संगीत हे केवळ मनोरंजनासाठी नाही.अर्थार्जनासाठी त्यावर अनेकजण अवलंबून आहेत.कोरोना काळात अशा कलावंतांचे फार हाल झालेले आहेत.त्यामुळे त्यांच्यासाठी भारत मेरा वतन हे गाणे मला गायला मिळाले हे मी भाग्य समजतो.
शंकर महादेवन,गायक

Exit mobile version