| रायगड | वार्ताहर |
संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवक व युवती जास्त संख्येने यावे यासाठी राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी व नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. रायगड जिल्ह्यामधील युवक, युवतींनी या संकेतस्थळावर दि.28 फेब्रुवारीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत्त) यांनी केले आहे.
यासाठीच्या पात्रता पुढीलप्रमाणे आहेत- अविवाहित मुलगा/मुलगी, महाराष्ट्राचे अधिवासी प्रमाणपत्र, जन्मतारीख 2 जानेवारी 2011 ते 1 जानेवारीदरम्यान, मार्च/एप्रिल/मे 2025 मध्ये होणार्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला व जून 2025 इयत्ता 11 वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावे. इच्छुकांनी www.spiaurangabad.com या संकेतस्थळावर युवकांनी, तर युवतींनी www.girlspinashik. कंपनी या संकेतस्थळावर विहित मुदतीत अर्ज सादर करावेत.