। पेण । वार्ताहार ।
कोव्हिडच्या पाश्वर्र्भूमीवर पेण नगरपालिकेची सर्व साधारण सभा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. या ऑनलाईन सभेमध्ये पहिल्यांदा मोठया प्रमाणात गोंधळ पहायला मिळाला. त्या नंतर मागील सभेचा इथिववृत्त दिला नाही म्हणून विरोधी नगरसेवक संतोष पाटील व शोमेर पेणकर यांनी जोरदार आक्षेप नोंदवून इथिववृत्त जाणूनबूजून देत नसल्याने इत्तिववृत्त दिल्या शिवाय अथवा इत्तिववृत्त वाचल्या शिवाय सभा पुढे चालु करायची नाही. मात्र नगराध्यक्षानी यामध्ये मध्यस्थी केली. पंरतु ज्येष्ठ नगरसेविका प्रतिभा जाधव यांना सभेची टिपणीच न मिळाल्याने सभा पुढे कशी चालेल या वर प्रतिभा जाधव, शोमेर पेणकर, संतोष पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरत अखेर प्रशासना कडून प्रशासकीय अधिकारी राजाराम नरुठे यांनी ज्येष्ठ नगरसेविका प्रतिभा जाधव यांची माफी मांगून दिलगीरी व्यक्त केली.
तर आंबेगाव येथील क्षेपनभूमीत सुरक्षा रक्षक नसल्याच ठाम मत प्रतिभा जाधव व संतोष पाटील यांनी मांडून नगराध्यक्षाना सांगितले की आमच्याकडे पुरावे आहेत. तर नगरपालिका प्रशासकीय सुरक्षा रक्षक हे स्थानिकच घ्यावे असे ठाम मत संतोष पाटील यांनी मांडल तर सत्ताधारी पक्षाचे प्रतोत अनिरुध्द पाटील यांनी देखील त्याला स्थानिक तरुणांनाच सुरक्षा रक्षक म्हणून नेमवावे याला पाठिंबा दिला. मात्र नगरपालिकेच्या 2020-21 आर्थिक लेखास मंजूरी देण्या बाबत शोमेर पेणकर, वसूधा पाटील, राजेंद्र वारकर आणि संतोष पाटील यांनी जोरदार आक्षेप घेऊन स्टेडियंम भाडे, किटयातील गैरव्यवहार, नगरोत्थान योजनेमधील निधी, विकास निधी, शिक्षण कर, जलशुध्दीकरण देखभाल ठेका, घनकचरा व्यवस्थापन या विषयावर आपल्या हरकती नोंदवल्या. तर राजू वारकर आणि शोमेर पेणकर यांनी बगिचा दुरावस्था व देखभाल ठेका यावर भाष्य करून प्रशासकीय अधिकारी ठेकेदाराला कशा प्रकारे मदत करतात व ठेकेदार काम चुकार पणा करून शहरातील बाग बगिचांना सुशोभीत करण्या पेक्षा भकास व उजाड करण्यातच धन्यता मानत आहेत. यावर नगराध्यक्ष प्रितम पाटील यांनी अधिकारी वर्गाची कान उघाडणी करत शहरातील बाग बगीचे जनतेच्यासाठी आहेत त्यामुळे ते योग्य राहिले पाहिजेत अन्यथा कारवाई केली जाईल असे सांगितले.
स्टेडियमचे भाडे वर्षाला 25 लाख 30 हजार येवढ अपेक्षीत असताना 5 लाख 52 हजार कसे जमा झाले या विषय नगरसेवक संतोष पाटील यांनी विचारणा केली असता प्रशासकीय अधिकार्यांकडून न पटणारी व अचंबित करणारी उत्तर ऐकायला मिळाली. शोमेर पेणकर यांनी सांगितल की गाळे धारकांची थकबाकी असताना पून्हा गाळे त्यांना दिलेच कसे याची चौकशी व्हावी. तर अनिरूध्द पाटील यांनी सांगितल की भाडयाचे पैसे हे अधिकार्यांच्या पगारातून कट करून घ्यावे. यावर कर विभागाचे अधिकारी डापसे यांनी लवकरात लवकर वसुली केली जाईल अस सांगितल.
तर इलेक्ट्रीक पोल स्थलांतरीत करण्याच्या विषयी झालेल्या खर्चा विषयी संतोष पाटील यांनी विचारणा केली असता अधिकारी वर्ग निरउत्तरीत झाले.मात्र संतोष पाटील यांनी पुन्हा त्या खर्चाचा तपशीलवार मागितला तेव्हा विदयुत अभियत्ता रेश्मा करबले हयांनी व्यवहाराला न पटणारी उत्तरे देऊन आठ पोलांचा खर्च सात लाख रूपये झाल्याच सांगितल.तर ज्येष्ठ नगरसेविका तथा विरोधी पक्ष नेता वसुधा पाटील यांनी कोव्हिड काळात मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना लाकड विनामुल्य द्यावी अस सभागृहाला सुचवल त्यावर नगराध्यक्षांनी माहिती घेऊन हया विषयाचा विचार करू. तसेच वसुधा पाटील यांनी आर.पी.नगरला काम होत नसल्याची खंत व्यक्त करून सत्ताधार्यांचा खरपुस समाचार घेतला.शेवटी पहिल्याच झालेल्या ऑनलाईन सभेमध्ये विरोधक व सत्ताधारी यांनी एकमेकात समन्वय साधून सर्वसाधारण सभा पार पाडली.