शिलार धरणाला विरोध; शेतकरी एकवटले, जनहित याचिका दाखल

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील कशेळे भागात चिल्हार नदीवर धरण बांधले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने मे 2025 मध्ये हे धरण मंजूर केले असून या धरणाला शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला आहे. या धरणाविरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तर धरण रद्द व्हावे, यासाठी हजारो शेतकरी कर्जत तहसील कार्यालयात मोर्चा घेऊन जाणार आहेत. याशिवाय वेळ पडल्यास कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा निर्धार शेतकऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला.

कर्जत तालुक्यातील चिल्हार नदीवर शिलार येथे धरण बांधले जाणार आहे. ग्रामीण भाग असणाऱ्या शिलार धरण प्रकल्पात पाच गाव तसेच येथील शेतकरी बाधीत होणार आहेत. या धरणाला विरोध करण्यासाठी पाथरज ग्रामपांचयतमधील किकवी गावाजळ एका फार्मऊसमध्ये या संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. सरकारने शिलार धरण मंजुर केले. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांना या धरण प्रकल्पासंदर्भात कोणत्याही प्रकारे माहिती देण्यात आली नाही. हा प्रकल्प मंजुर झाल्यापासुन येथील स्थानिक कार्यकर्ते दिनेश रसाळ यांनी किकवी येथील सर्व शेतकरी व प्रकल्प बाधीत यांना एकत्र घेऊन चर्चा केली. याप्रकरणात शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. तरीदेखील संबंधित कंपनी व ठेकेदारांनी शेतकऱ्यांना विचारात न घेता कामाला सुरुवात केली. अखेर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत काम बंद केले. या धरणाच्या परिसरात असलेल्या सर्व ग्रामपंचायतींनी धरणाला विरोध करणारे ठराव केले असून धरण व्हावे, यासाठी सरकार करीत असलेल्या धोरणाबद्दल निषेध व्यक्त केला आहे.

Exit mobile version