निबंध स्पर्धेचे आयोजन

| अलिबाग | वार्ताहर |

सा. कुलाबा वैभवचे संपादन तथा अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बळवंत वालेकर यांच्या 80 व्या वाढदिवाचे औचित्य साधून मंगळवार, दि.12 रोजी अ.ता.शि.प्र.मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेतील विजेत्यांना त्याच दिवशी दुपारी एक वाजता शिशुविहार प्राथमिक शाळा, अलिबाग येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव द.ल. माळवी यांनी दिली.

Exit mobile version