| अलिबाग | प्रतिनिधी |
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे किल्ले रायगड येथे रविवार, दि. 8 जानेवारी 2023 रोजी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, स्थानिक उत्सव समिती, महाड तर्फे गडारोहण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा 14, 17, 21, खुला गट अशा प्रकारे पुरुष व महिलांसाठी होणार आहे.
प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाचे वितरण श्री शिवपुण्यतिथी दिनी गुरुवार, दि.6 एप्रिल 2023 रोजी रायगड येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष त्रिंबक कृष्णाजी पुरोहित – 9403090521 यांनी केले आहे.