माणगावात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन


| माणगाव | वार्ताहर |

माणगावात शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल व तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक विजयशेठ मेथा चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे बुधवारी (दि. 13) सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत एचडीएफसी बँकेच्या समोर, मुंबई-गोवा महामार्गालगत पेपर विक्रेते नितीन मेथा यांचा सभागृह जुने एसटी स्टँड माणगाव याठिकाणी करण्यात आले आहे. तरी सदर शिबिराचा लाभ समाजातील सर्व गरीब गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन उद्योजक विजयशेठ मेथा यांनी केले आहे.

या शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणार्‍या रुग्णांनी येताना सोबत आधारकार्ड व रेशनकार्ड याची झेरॉक्स प्रत आणावी. तसेच, मधुमेहाची व रक्तदाबाची औषधे सुरु असल्यास ती देखील घेऊन यावीत. शिबिरात सहभागी होणार्‍या नेत्ररुग्णांनी नाव नोंदणीकरिता विधिता मनीष मेथा मो.नं.8698740640, सुप्रिया संतोष शिंदे मो.नं.9049665598 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version