। गडब । वार्ताहर ।
अनुलोम संस्था व हिंदूस्थान इन्सेक्टि साईड्स लि.तर्फे जिल्हयातील शेतकरी प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन 24 मार्च रोजी स. 10 ते 2 या वेळेत ज्ञानेश्वर मंदिर, भूंडया पूलाजवळ, पेण येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षण मेळाव्यात पिकांवर रासायनिक किटकनाशक व औषध फवारणी करताना घ्यावयाची काळजी, शेतकर्यांना शासकीय योजना ,शेतकरी उत्पादक संघ आदी विषयावर जिल्हा कृषी अधिक्षक उज्वला बाणखेले, जिल्हा मत्स्य अधिकारी संजय पाटील, विकास यादव,अनूलोमचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वानंद ओक, भारतीय किसान संघाचे प्रमोद लांगी, प्रयोगशिल शेतकरी दिनेश पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या शिबिरासाठी शेतकर्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अनूलोमचे विभाग समन्वयक विजय मोरगूलवार, जीवन म्हात्रे यांनी केले आहे.