। उरण । वार्ताहर ।
उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत तसेच सेबी यांच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता या कार्यक्रमांतर्गत शेअर मार्केट कार्यशाळा या कार्यक्रमांचे आयोजन शनिवारी (दि.5) करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील एकूण 78 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाद होता. यापैकी 54 विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यामध्ये यश आले आहे. या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून जगदीश माने यांनी अतिशय उत्तमरित्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र उच्चतंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान केंद्र केंद्राचे प्रमुख यशवंत शितोळे तसेच त्यांच्या संपूर्ण टीमचे महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्राचार्य के. ए. श्यामा यांचे देखील बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले असून सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.