रसायनीत हॅकाथॉनचे आयोजन, 14 राज्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग

| रसायनी । वार्ताहर ।
रसायनी येथील पिल्लई एचओसी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान रसायनी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातर्फे तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील हॅकाथॉन हॅकओव्हरफ्लो 1.0 चे आयोजन करण्यात आले होते. यात भारतातील चौदा राज्यांतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. हॅकाथॉनचे उदघाटनास अंजनीकुमार ठाकूर, श्रीधर मानकर डॉ. वासुदेवन पिल्लई, डॉ. जे. डब्ल्यू. बकाल, उपस्थित होते.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील त्यांचे कौशल्य आणि सर्जनशीलता प्रदर्शित करण्यासाठी देशभरातील विद्यार्थ्यांना एकत्र आणणे हा हॅकाथॉनचा उद्देश होता. त्यांच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या प्रयत्नांचा केंद्रबिंदू वास्तविक जग आणि सामाजिक समस्या सोडवणे हा होता. हॅकाथॉन ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे आयोजित करण्यात आली होती.ऑफलाइन मोडमध्ये एकूण 151 संघांची नोंदणी करण्यात आली होती, त्यापैकी 62 संघांना अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले होते. ऑनलाइन मोडमध्ये, 400 हून अधिक संघांनी भाग घेतला होता.

Exit mobile version