हनुमान जन्मोत्सव निमित्त कीर्तनाचे आयोजन

| सुकेळी | वार्ताहर ।

ऐनघर (ता.रोहा) येथे बुधवार दि. 5 व 6 रोजी जय हनुमान जन्मोत्सव सोहळा व सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांसोबतच राहुरी (जि.अहमदनगर) येथील युवा कीर्तनकार अमोल महाराज पिसे यांचे कीर्तन होणार आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात बुधवार, दि.5 रोजी सत्यनारायणाची महापूजा, ऐनघर पंचक्रोशी व आमडोशी यांचा हरिपाठ झाल्यानंतर महाप्रसाद होईल. त्यानंतर रात्री 9 ते 11 या वेळेत अमोल महाराज पिसे यांची किर्तन सेवा होईल. गुरुवार दि. 6 रोजी सकाळी 7 वा. जय हनुमान जन्मोत्सव व आरती झाल्यानंतर दुपारी महिलांसाठी हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर संपूर्ण ऐनघर गावातुन जय हनुमान पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. शेवटी ऐनघर ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात येईल. तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जय हनुमान मित्र मंडळ, ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ ऐनघर यांनी केले आहे.

Exit mobile version