माणगावात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

| माणगाव | वार्ताहर |

सह्याद्री स्पोर्ट्स वेलफेअर असोशिएशन माणगाव व टीडब्लूजे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.18) सकाळी 6 वा. टिकमभाई मेथा वाणिज्य महाविद्यालय बामणोली रोड, बस स्थानकाच्या मागे माणगाव येथे जिल्हास्तरीय सह्याद्री मॅरेथॉन 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्राची सागरकन्या डॉल्फिन क्वीन रुपाली रेपाले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी 150 रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकास आकर्षक बक्षिसासह सन्मानपदक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र व सोबत टीशर्ट दिले जाणार आहे. या स्पर्धेची जोरदार तयारी आयोजकांतर्फे करण्यात आली असून स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी समीर महामुणकर मो. नं. 8087872245, मुनाफ मुकादम मो. नं 9420324733, सखाराम कदम मो. नं 7507408478, तुकाराम चव्हाण मो. नं. 9021112474 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version