मेरी मिट्टी मेरा देश अभियानाचे आयोजन

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गतमेरी मिट्टी मेरा देश हे अभियानाचे आयोजन मुरुड-जंजिरा नगरपरिषदेतर्फे मुरुड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन करण्यात येत आहेत. या निमित्त शहरातील सिध्दीबाग उद्यान याठिकाणी 9 आगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता शिलाफलक अनावरण व वीरांना वंदन करण्यात येणार आहे. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये व कार्यालयात 20 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता पंचप्रण शपथ, दत्तमंदिर रस्ता या ठिकाणी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30वाजता वसुधा वंदन, शहरातील सर्व नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट पर्यत आपल्या घरोघरी तिरंगा फडकवयाचा आहे. तर 16 ते 20 ऑगस्टपर्यत नगरपरिषद हद्दीतील प्रभाग निहाय एक /दोन मुठ माती घेऊन त्याचा कलश तयार करणे असे विविध कार्यक्रमांचे आयोजन नगरपरिषदतर्फे करण्यात आले आसुन सदर अभियानामध्ये नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य करावे.असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी केले आहे.

Exit mobile version