राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन

रायगडातील कराटेपटूंची ‌‘सुवर्ण’ कामगिरी

| रसायनी | वार्ताहर |

पुणे येथे के. एस. वॉरियर्स ऑल स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक कीर्ती पाटील, सचिव पाटील तसेच आशिष डोईफोडे यांच्याद्वारे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सी.के.टी महाविद्यालय, एस.एम.डी.एल. महाविद्यालय तसेच स्मॉल वंडर्स स्कूल येथील एकूण 46 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तसेच, या स्पर्धेत राज्यातील जवळपास 200 हुन अधिक खेळाडूंनी सहभाग नोदविला होता. तसेच, मार्शल आर्ट या खेळाला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव गडदे, डॉ. एस.के. पाटील, प्रीती महाजन आणि माधुरी संबोधी यांच्यामुळे जिल्ह्यात व राज्यात स्थान मिळाले आहे.

या स्पर्धेत भूपेंद्र मार्शल आर्ट ट्रेनिंग प्रोव्हायडर यांच्या खेळाडूंनी 5 सुवर्णपदक 12 रौप्यपदक आणि 28 कांस्यपदक पटकावले आहेत. तसेच, पहिली बिग चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावल्या बद्दल या विजयी खेळाडूंचा आयोजकांच्या माध्यमातून गौरव करण्यात आला. तसेच भूपेंद्र मार्शल आर्ट ट्रेनिंग प्रोव्हायडरचे संस्थापक व इंडिया ब्लॅक बेल्ट असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य टेक्निकल डायरेक्टर मास्टर भूपेंद्र गायकवाड गेली 20 वर्षे आत्मसंरक्षण, जिमनॅस्टिक, मेडिटेशन, अस्त्र-शस्त्र या मार्शल आर्ट कलेचे निरंतर प्रशिक्षण देत आहेत. त्यांची जिद्द, अथक मेहनत व उत्कृष्ट प्रशिक्षणामुळे आज खेळाडूंनी अतिशय चांगल्या पद्धतीने यश संपादन केले आहे. अभ्यासाबरोबर शरीर सुद्धा मजबूत पाहिजे व स्वतःचे आत्मसंरक्षण करता आलेच पाहिजे. यासाठी मार्शल आर्ट प्रशिक्षण हे शिकण्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना मुलींना प्रोत्साहित केले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

सुवर्णपदक – वेदांत मोहिते, हर्षल कुंडलकर, राज शितोळे, यश मोरे, स्वराज इंगळे
रौप्यपदक – सारा घाडी, अक्षया बनसोडे, स्वरा पिसाळ, समीक्षा इंगळे, आर्यन साह, देवेश नवीन, अविर बनसोडे, अंश पगार, वेदांत शेटे, सार्थक पवळे, दक्ष
पुण्या, असित इंगळे
कांस्यपदक –अनन्या कोरी, अशिता वालावलकर, आहाना सोलंकी, तीर्था शेट्टी, मृणाल वाढवळ, परिणीधी सिंग, निशा सरदार, अंजली साह, अन्वी मोरजकर,
वृद्धी बिरादार, जिया डोंगरे, श्वेता देवकते, समरजीत सिंग, निहार शिंदे, श्रेयश देवकते, वेदांत कुडके, प्रतीक अहिरवाडगी, सोहम इंगळे, ओम
कोठावले, ध्रुव दिघाडे, स्वराज पाटील, यथार्थ सोनावणे, श्रवण पाटील, यशराज चव्हाण, राजवीर भोईटे,मित पाटील, रिजूल कुंडलकर, श्रेयश मडके.

Exit mobile version