| अलिबाग । वार्ताहर ।
प्रतिक थिएटर्स व आगरी साहित्य विकास मंडळ वाशी, यांच्या संयुक्त विद्यमाने मॉरिशस देशातील मराठी कलावंतांची आनंदवारी अंतर्गत नृत्याविष्कार हा मनोरंजनाचा कार्यक्रम सोमवार (दि.7) पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सायंकाळी 4:30 वाजता सादर होणार आहे. तसेच हाच कार्यक्रम पुन्हा वाशी येथील मराठी साहित्य सांस्कृती मंडळाच्या नाट्यगृहात मंगळवार (दि.8) सायंकाळी 6:30 वाजता नाट्यरसिकांसाठी उपलब्ध होणार आहे. मॉरिशस दूरदर्शनचे अर्जुन पुतलाजी व वाशी येथील आगरी साहित्य विकास मंडळाचे मोहन भोईर हे प्रमुख आयोजक आहेत. कार्यक्रमासाठी प्रा.चंद्रकांत मढवी, पुंडलिक म्हात्रे, मनोज म्हात्रे, रमेश फुलावरे, श्रीकांत पाटील यांचे सहकार्य लाभणार आहे.