रायगड जिल्ह्यात महावाचन उत्सव

। अलिबाग । प्रतिनिधी ।

समग्र शिक्षा रायगड जिल्हा परिषद, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.30) महावाचन उत्सवाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करून या उत्सवाला सुरुवात करण्यात आली. यानिमित्त अलिबाग शहरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवावी यादृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात आले.

यावेळी प्राथमिक शिक्षण अधिकारी पूनिता गुरव, माध्यमिक शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे, उपशिक्षण अधिकारी सुनिल भोपळे, विस्तार अधिकारी कल्पना काकडे, गटशिक्षण अधिकारी कृष्णा पिंगळा, कन्या शाळा मुख्याध्यापिका प्रतिभा वेदपाठक, अनिल राऊत, बिपीन राऊत यांच्यासह शिक्षण विभागातील कर्मचारी, कन्या शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

अलिबाग शहरातील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती जा. र. ह. कन्या शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती या विषयी उपशिक्षण अधिकारी संतोष शेडगे, विचारवंत अ‍ॅड. के. डी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार सुभाष म्हात्रे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संबंधितांनी जीवनात पुस्तके, वर्तमानपत्रे यांचे महत्त्व, वाचनामुळे होणारे फायदे, मोबाईलचा अतिवापर करण्याचे दुष्परिणाम याची माहिती देण्यात आली.

Exit mobile version