विजयादशमी निमित्त रा.स्व. संघाचे संचलन

| पनवेल | प्रतिनिधी |
विजयादशमी निमित्त सीमोल्लंघन करण्याची हिंदु धर्मात परंपरा आहे. ह्या परंपरेला अनुसरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पनवेल येथे पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. गेली दोन वर्षे कोरोना निर्बंधामुळे पथसंचलन झाले नव्हते. त्यामुळे यावर्षी संघ स्वयंसेवकांमध्ये वेगळाच उत्साह होता, अतिशय शिस्तबद्ध व दिमाखदार असे संचलन पनवेलकरांना अनुभवायला मिळाले. हे संचलन रचना व प्रार्थना करून शहर पोलिस स्टेशनपासून सुरू झाले.घोष (बँड) पथक, ध्वज दंडासह करांजडे पासून ठाणानाका एवढ्या भागातील गणवेशातील शंभर ते सव्वाशे स्वयंसेवकांचे हे संचलन एचोसी कॉलनी कफ नगर सावरकर पुतळा अशा मार्गाने गेले. वाटेत ठिकठिकाणी ध्वजासह स्वयंसेवकांवर लोकांनी पुष्पवृष्टी केली.

संचलनाची सांगता शहरातील चिंतामणी हॉल येथे झाली. हॉलमध्ये शस्त्रपूजन, प्रात्यक्षिके व्याख्यान असा कार्यक्रम झाला यावेळी स्वयंसेवकां कडून प्रात्यक्षिके सादर केली गेली. उत्सवाला वक्ते म्हणून संघाच्या कोकण प्रांताच्या महाविद्यालयीन विभागाचे प्रमुख सुहास पोतदार उपस्थित होते, त्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पोलिस अधिकारी तथा आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग शिक्षक हनुमंतराव शिंदे हे उपस्थित होते.v

Exit mobile version