पनवेलमध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन

जे.एम. म्हात्रे ट्रस्टसह विविध संस्थांचा सहभाग
। पनवेल । प्रतिनिधी ।

पालिका प्रशासनावर स्वच्छतेच्या बाबतीत अवलंबून न राहता पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छतादूत त्यांच्यासोबत स्वयंस्फूर्तीने माझ्या जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सभासदांसोबत इश फाऊंडेशन, झिरो फाऊंडेशन, युवा फाऊंडेशन, सुमन साळी महिला व बाल विकास संस्था, अक्षरवेल ज्योती फाऊंडेशन, लायन्स क्लब ऑफ कामोठे, पंजाबी कल्चर अँड वेल्फेअर असोसिएशन, लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडरेशन या सर्व सामाजिक संस्था आणि त्यांचे सदस्य तसेच खारघर मधील नागरिकांनी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.
पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत पालिका प्रशासनावर अवलंबून न राहता सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन हा सुरू केलेला उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे या स्वच्छता मोहिमेच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या संस्थेच्या सभासदांनीसुद्धा श्रमदान केले.

या स्वच्छता मोहिमेसारखी विविध सामाजिक उपक्रम इतर सामाजिक संस्थांनी सुद्धा पुढाकार घेऊन राबवावे. जेणेकरून आपले पनवेल महानगरपालिका क्षेत्र स्वच्छ आणि आरोग्यमय होईल. -प्रीतम म्हात्रे

Exit mobile version