| आगरदांडा | प्रतिनिधी |
श्री दत्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने मुरुड शहराजवळील श्री दत्त मंदिरात दिवाळी पहाट विशेष किल्ले बांधणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सोमवारी (दि.20) सकाळी 7 ते 10 पर्यंत घेण्यात येईल. या स्पर्धेसाठी कोणताही किल्ला निवडता येईल. स्पर्धेसाठी लाल माती आयोजकांमार्फत दिली जाईल. ही स्पर्धा एकत्रपणे दोन विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. स्पर्धेसाठी लागणाऱ्या इतर वस्तु स्पर्धकांनी स्वतः घेऊन याव्यात. प्रथम गटात इ. 5 वी ते इ. 12 वी तर द्वितीय गट खुला असणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आपली नावे शनिवारी (दि.18) पर्यंत कोटेश्वरी हेरीटेज बिल्डींग, पी. डी. डेव्हलपर्स ऑफिसमध्ये नोंदवावी, असे आवाहन श्री दत्त देवस्थान ट्रस्ट मुरुड-जंजिरा अध्यक्ष प्रमोद द. भायदे यांनी केले आहे. तसेच, या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा श्री दत्त जयंती उत्सवाच्या वेळी श्री दत्तमंदिर सभागृह येथे दि.06 डिसेंबर रोजी सायं. 6 वा. आयोजित करण्यात आला आहे.
किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन
