| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील श्रीशिवप्रेमी शिवभक्त मित्र मंडळ मजगाव नांदगावतर्फे दिपावलीच्या सुट्टीमध्ये तालुकास्तरीय किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धकांनी किल्ले आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेत उभारणे आवश्यक आहे. इच्छुक स्पर्धकांनी दि. 16 ऑक्टोबरपर्यत आपली नावे मंडळाकडे द्यावीत. किल्ले 18 ऑक्टोबरपर्यंत उभारुन पूर्ण करावेत. शिवदुर्ग विज्ञान व गडकिल्ल्यांची नाविन्यपूर्ण कल्पनेनुसार त्यांची उभारणी, देखावा, मातीकाम व इतर सजावटींना विशेष प्राधान्य देण्यात येईल. किल्ले हे स्वहस्ते व नैसर्गिक साधनांचा वापर करुन उभारावेत. त्यात प्लॅस्टिकचा वापर करू नये. उभारलेल्या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती देणे बंधनकारक आहे. किल्ल्यांचे दि. 19 ते 23 ऑक्टोबर 2025 या दरम्यान परीक्षण केले जाईल. उभारलेल्या किल्ल्यांच्या परीक्षणाची तारिख व वेळ आयोजकाकडून स्वतः माहित करुन घ्यावी. स्पर्धेत विजयी होणाऱ्या प्रथम 3 स्पर्धकांना व उत्तेजनार्थ 3 स्पर्धकांना बक्षिसे देण्यात येतील. मुलीसांठी स्वतंत्र बक्षीस देण्यात येईल.
तसेच, स्पर्धक हे इयत्ता चौथी व पदवीपर्यंत शिक्षण घेणारे असावेत. नाव नोंदणी व संपर्कासाठी – आशिष बुल्लु – 823275668, नाथा भाऊ गिरणेकर – 9225487844, समिर माळी – 8237702595, शनिकेत भोईर – 8983092048, योगेश घरत – 7821021204, नितेश कांबळे – 8149245358 या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच, तालुक्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.







