शिवजयंती सोहळ्यानिमित्त सभेचे आयोजन

| माणगाव | वार्ताहर |

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गेल्या 17 वर्षांपासून माणगांवमध्ये मोठ्या उत्साहात मराठा कर्मचारी मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी साजरी करण्यात येते. मात्र छत्रपती शिवरायांच्या जयंतीला एक उत्सवाचे स्वरूप यावे म्हणून यावर्षांपासून ‘शिवजयंती सोहळा माणगांव’ या नावाने सर्व जाती- धर्मातील बांधवांनी सहभागी होऊन सर्व माणगांवकरांच्यावतीने महाराजांची जयंती साजरी करण्याचा मानस मराठा कर्मचारी मित्रमंडळाने केला आहे. त्याअनुषंगाने सर्वानुमते निर्णय घेण्यासाठी रविवार (दि.4) सकाळी ठीक 11 वाजता अशोकदादा साबळे विद्यालय माणगाव येथे माणगावमधील सर्व मान्यवर, लोकप्रतिनिधी, विविध संघटना, युवक मंडळ, व्यापारी, पत्रकार यांच्या संयुक्त सभेचे आयोजन मंडळातर्फे करण्यात आले आहे. सर्वसमावेशक ‘शिवजयंती उत्सव’ साजरा करण्यासाठी सभेस उपस्थित रहावे अशी विनंती मंडळातर्फे करण्यात आली आहे.

Exit mobile version