। रेवदंडा । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथील कुस्ती प्रशिक्षण केंद्रात रायगड जिल्हा, अलिबाग तालुका कुस्तीगीर संस्था व हनुमान तालिम संघ वाडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.29) दुपारी 2ः00 वाजता जिल्हा कुस्ती अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पुर्वी सकाळी 9 ते 12 या दरम्यान वजनाची वेळ असेल, असे रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटना अध्यक्ष जयेंद्र भगत यांनी सांगितले आहे. या जिल्हा कुस्ती अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत सब ज्युनिअर मुलीं, सब ज्युनियअर मुलें, वरिष्ठ गट पुरूष गादी व माती, वरिष्ठ गट महिला विभाग, वरिष्ठ गट पुरूष ग्रीकोरोमण, बाळ गट मुंली व बाळ गट मुले या गटात वजनानुसार कुस्ती खेळविण्यात येणार आहेत.







