विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन

। पनवेल । वार्ताहर ।
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आंदोलनाचे नेते तथा मुंबईचे पहिले सर्वात तरुण महापौर म्हणून ओळख असलेल्या युसूफ मेहेरअली यांच्या एकशे अठराव्या जयंतीनिमित्त पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागासह शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा लहान व मोठा अशा दोन गटांत घेतली जाणार आहे. सदर स्पर्धेचे प्रवेश निशुल्क असून स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे अनुक्रमे 1 हजार 500 रूपये, 1 हजार रूपये, 500 रूपये अशी रोख रक्कम व सन्मानपत्र देण्यात येणार आहे तरी सर्व शैक्षणिक संस्था चालक वा शिक्षकांनी आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना ह्या स्पर्धेत भाग घेण्यास प्रवृत्त करून सहभागी विद्यार्थ्याचे निबंध 28 सप्टेंबर 2021 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने गुगल लिंकद्वारे पाठविण्याचे आवाहन युसूफ मेहेरअली सेंटरचे प्रकल्प संचालक सुरेश रासम यांनी केले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी 9920320508 /8007170783/ 9029800066/ 9404808812 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही सुरेश रासम यांनी केले आहे.

Exit mobile version