। पनवेल । वार्ताहर ।
एका केबल व्यवसायिकाची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना तालुक्यातील तारा गावात घडली आहे. येथील केबल व्यवसायिक मोहन पाटील यांना मे महिन्यात सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या फेसबुकवर लिंक पाठवून वेबसाईटवर गुंतवणुकीवर 10 टक्के अधिक परतावा देण्याचे प्रलोभन दाखवले. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला गुंतवलेल्या रकमेवर अधिकचा परतावा मिळाला. त्यातून त्यांचा विश्वास वाढवून त्यांनी प्रथम 48 हजार व नंतर 43 हजार पुन्हा गुंतविले मात्र परतावा मिळाला नाही व त्यांना आणखी रक्कम भरण्यास सांगण्यात आले. असे मिळून जवळपास 2 लाख रूपये उकळण्यात आले. मात्र त्यानंतर संबंधित व्यक्तीशी संपर्क न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.