देवकान्हेत आरोग्य शिबिराचे आयोजन

। खांब-रोहा । वार्ताहर ।
रायगड मेडिकल असोशिएशन व देवकान्हे ग्रा.पं.यांच्या संयुक्त विद्यमाने दि.24 ते 26 मे रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन ग्रा.पं.हद्दीतील गावांमध्ये करण्यात आले आहे. वसंत भोईर यांनी सदरचे शिबिराचे आयोजन केले असून या शिबिरात तज्ञ डॉ. सुनील घुगे मुंबई, सचिन घुगे मुंबई, प्रसाद पाटील या तज्ञांच्या वतीने आधुनिक मशिन्सद्वारे पूर्ण शरिराची तपासणी, इ.आजारांवर मोफत तपासणी करून उपचार सुचविले जातील, तर आजांवरील औषधे ही शिबिरामध्ये अल्पदरात दिली जातील अशाप्रकारची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.24 रोजी देवकान्हे येथे स.9 वा.जय हनुमान मंदिर येथे करण्यात येणार असून ता. 25 रोजी सदरचे शिबीर श्री. गावदेवी मंदिर बाहे येथे तर ता.26 रोजी जय हनुमान मंदिर बाहे येथे संपूर्ण दिवसभर सुरू राहणार आहे. तरी अधिक माहितीसाठी सनी जंगम 8421390884 व निनोद जंगम 7719893132 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version