आरोग्य विषयक शिबिराचे आयोजन

। अलिबाग । वार्ताहर ।
अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया आणि पहिले माझे कर्तव्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भाग्यलक्ष्मी हॉल, चेंढरे, अलिबाग येथे रविवारी (दि.27 मार्च) दुपारी 2 ते 5 या वेळेत अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त स्तन कर्करोग व अ‍ॅनिमिया मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. या कार्यक्रमामध्ये अंकशास्त्र तज्ञ मानसी काळे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. प्रमुख पाहुण्या म्हणून पहिले माझे कर्तव्य फाऊंडेशन अध्यक्षा नयना कनल, आर.सी.एफ. माध्यमिक शाळा मुख्याध्यापिका संविधा जाधव, अलिबाग पुरवठा निरीक्षण अधिकारी नम्रता भोयर, अलिबाग पशुधन विकास अधिकारी डॉ. मेघा खवसकर यांची उपस्थिती असणार आहे. तर, राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र अरोरा, राष्ट्रीय मुख्यसचिव धनंजय म्हात्रे, राज्य सचिव प्रसन्न्कुमार जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

Exit mobile version