मनसे रायगड चषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन

। अलिबाग । वार्ताहर ।
छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मनसेतर्फे मनसे रायगड चषक 2022 या नाईट क्रिकेटच्या भव्य सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सामने कोषाणे येथे 13 एप्रिल ते 16 एप्रिल असे चार रंगणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे, मनसे नेता बाळा नांदगावकर, संगीतकार अजय व अतुल गोगावले, कला दिग्दर्शक नितीन देसाई हे उपस्थित राहणार आहेत. तसेच, मनसेचे पदाधिकारी नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अनिल शिदोरे, अभिजित पानसे, मनसे आ. राजू पाटील, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकुर, मनसे प्रवक्ता सरचिटणीस संदिप देशपांडे, मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर, मनसे महिला सेना कोकण संपर्क नेते स्नेहल जाधव, मनसे कामगार सेना सरचिटणीस गजानन राणे, रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर, रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर व पोलिस अधिक्षक रायगड अशोक दुधे यांची उपस्थित असणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन रायगड जिल्हा मनसे व महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केले असून या कार्यक्रमासोबतच आदिवासी शाळांना संगणक व स्पर्धा परिक्षा पुस्तक यांचे वाटपदेखील करण्यात येणार आहे.

Exit mobile version