। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड डाक विभागातर्फे गुरुवारी (दि.30) सकाळी 11 वाजता अधीक्षक डाकघर रायगड यांच्या कार्यालयाद्वारे डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. यावेळी रायगड विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/समस्या ज्याचे निवारण 6 आठवडा कालावधीत झालेले नाही, अश्राा टपाल, स्पीडपोस्ट, काऊटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील. तरी इच्छूक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत डॉ. संजय लिये, अधीक्षक डाकघर रायगड विभाग 402201 यांच्याकडे शुक्रवार (दि.24) पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.