। खरोशी । वार्ताहर ।
नेताजी पालकर मंडळ चौक तर्फे दरवर्षीप्रमाणे चावणी येथील 361 व्या उंबरखिंड विजय दिनानिमित्ताने 2 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.’नरवीर तानाजी मालुसरे-जीवन कार्य’या विषयावर 2000 शब्दमर्यादे पर्यंत कागदाच्या एका बाजूस स्व हस्तलिखित (चित्रांसह) लिहिण्याचा असून स्पर्धकांनी आपले नाव, पत्ता, शिक्षण,व्यवसाय, मोबाईल नंबर, लिहिलेला स्वतंत्र कागद निबंधसह जोडायचा आहे. स्पर्धकांनी आपले निबंध 25 जानेवारी पर्यंत पोस्टाने किंवा स्वहस्ते सर्वश्री श्री.यशवंत गोपाळ सकपाळ ब्राम्हण आळी, मु.पो- चौक, ता- खालापूर, जि- रायगड 410206.भूषण जयवंत पिंगळे, 10,आशीर्वाद अपार्टमेंट, विठ्ठल नगर, कर्जत, ता- कर्जत, जि- रायगड, 410201 यांचेकडे पाठवावे. तसेच स्पर्धेत सहभागी होणार्या सर्व स्पर्धकांना श – लशीींळषळलरींश पाठवण्यात येईल. सदर स्पर्धेत सहभागी होऊन इतिहास जागृतीच्या कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन नेताजी पालकर मंडळाचे संघटक यशवंत सकपाळ यांनी केले आहे.